मालवण ज्येष्ठ नागरिक संघाची २६ रोजी बैठक

मालवण,दि.२३ जानेवारी

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न), मालवणची मासिक बैठक २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. येथील हॉटेल लिलांजली, भरड येथे होणार आहे. बैठकीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन, ७५ वर्षे पूर्ण झालेल्या तीन सदस्यांचा सत्कार तसेच चंद्रकांत गोखले यांचे मार्गदर्शन होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.