तारकर्लीतील स्वामी समर्थ मठात २८ पासून कार्यक्रम

मालवण,दि.२३ जानेवारी

तारकर्ली येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या १९ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुका अक्कलकोट येथून तारकर्ली येथे येणार आहेत.

दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. श्री मूर्तीवर अभिषेक, ८.३० वा. श्री दत्त मंदिर, वायरी बांध येथून पालखीची मिरवणूक, दुपारी १२ वा. महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. लिंग रवळनाथ भजन मंडळ, पोखरणचे बुवा समीर कदम यांचे भजन, ५ वा. खेळ पैठणीचा (सादरकर्ते- नागेश नेमळेकर, कुडाळ), रात्री १० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग, २९ रोजी सकाळी ८ वा. मूर्तीवर अभिषेक, सायंकाळी ४ वा. हळदीकुंकू, ५ वा. महापुरुष महिला भजन मंडळ, तारकर्ली वरचीवाडी यांचे भजन, ६ वा. वारकरी भजन, ७.३० वा. आरती, रात्री १० वा. स्वामी समर्थ चरित्रावर आधारित वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोलीचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे..