शासनाची दिशाभूल करत फोंडाघाट ग्रा.प जवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम

फोंडाघाट,दि.२३ जानेवारी(संजय सावंत)
वैयक्तिक हितसंबंध सांभाळण्याकरिता फोंडाघाट ग्राम पंचायत जवळील संरक्षण भिंत आहे असे भासवून शितोळे सर्विसिंग सेंटरच्याा बाजूला बेकायदेशीर रित्या संरक्षण भिंतं बांधली जात आहे तसेच ही संरक्षण भिंत शेरवी जमिनीत येत असून उगवाई नदीच्या नदी पात्रात या संरक्षण भिंती मुळे अतिक्रमण होत असून सर्व शासन नियम धाब्यावर बसवून बोगस पद्धतीने या संरक्षण भीतीचे काम सुरु असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ समीर सामंत यांनी गटविकास अधिकारी कणकवली यांना दिलेल्या निवेदनात केला असून या बांधकामाची चौकशी करून संबधितांवर कार्यवाही करावी अन्यथा प.स.कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी कणकवली यांना दिलेल्या निवेदनात, शासनाची दिशाभूल करत फोंडाघाट ग्रामपंचायत जवळ संरक्षण भिंत न बांधता शितोळे सर्व्हिसिंग सेंटर च्या बाजूला संरक्षण भिंत बांधली जात असून बांधकाम होत असलेली जमीन शेरवी प्रकारातील असून यावर शासन नियमानुसार बांधकाम करण्याची परवानगी नसल्याचे सांगत या बांधकामामुळे उगवाई नदीच्या नदी पात्रात अतिक्रमण होत आहे.तसेच या बांधकामासाठी कुठचेही निकष न वापरत सर्वे केलाच कसा व या बांधकामासाठी परमिशन दिली कशी याचे सर्व नियम धाब्यावर बसवून या संरक्षण भिंतीचे बिनदिक्कत काम चालू आहे याकरिता 9 जानेवारी 2024 रोजी आपण माहिती च्या अधिकारात बांधकामाबाबत माहिती मागविली होती व माहिती मिळेपर्यंत सदरचे बांधकाम बंद ठेवावे असे ग्रामपंचायत फोंडाघाट यांना पत्र दिले होते व दुसरे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली यांना देण्यात आले होते मत मात्र सदरच्या काम सदरच्या बांधकामाबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही तरी या बांधकामाबाबत चौकशी करून तात्काळ संबधितांवर कार्यवाही करावी अन्यथा आपण कोणतीही सूचना न देता आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनात फोंडाघाट ग्रामस्थ समीर सामंत यांनी म्हटले आहे.