महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी पन्नास रुपये अतिरिक्त दंड माफ

विधिमंडळ अधिवेशनात मंत्री दादा भुसे यांनी केली घोषणा

सावंतवाडी,दि.११ जुलै
महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी पन्नास रुपये अतिरिक्त दंड माफ करण्यात आलेला आहे. तशी घोषणा विधिमंडळ अधिवेशनात मंत्री दादा भुसे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रिक्षा चालकांनी विलंब झाला तर अतिरिक्त दंड आकारला जात आहे याकडे लक्ष वेधले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सहानुभूती दाखवत हा दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा युनियन सेक्रेटरी सुधीर पराडकर यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.