अणाव घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड

अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

कुडाळ,दि.११ जुलै

कुडाळ तालुक्यातील अणाव मुख्य रस्ता ते घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात दोन ठिकाणी वाहून गेला आहे. नाबार्ड योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी रु. या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते. पाऊस सुरु होण्याच्या कालावधीत हा रस्ता बनविल्यामुळे मजबूत न झाल्याने तो रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. काल बुधवारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली. सध्यस्थितीची माहिती आमदार वैभव नाईक यांना देत हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्याची मागणी केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, पावशी विभागप्रमुख दीपक आंगणे, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, युवासेना उपतालुकाप्रमुख शिवराम अणावकर, अमोल पालव,प्रदीप परब आदी उपस्थित होते.