स्वीफ्ट कारला दुचाकीची धडक बसल्याने झारापं पत्रादेवी बायपास महामार्गांवर वेत्ये फौजदारवाडी येथे अपघात

सावंतवाडी,दि.११ जुलै
स्वीफ्ट कारला दुचाकीची धडक बसल्याने झारापं पत्रादेवी बायपास महामार्गांवर वेत्ये फौजदारवाडी येथे अपघात झाला. या अपघातात चराठे येथील शशिकांत बाबाजी सावंत (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने गोवा बांबोळी रुग्णालयात हलवीण्यात आले. गुरुवारी सकाळी साडे दहा वा हा अपघात झाला. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
यातील दुचाकी घेऊन सावंत हे सकाळी वेत्ये-फौजदारवाडी तिठा येथे झाराप- पत्रादेवी महामार्गा दरम्यान कुडाळच्या दिशेने विरुद्ध बाजूने जात होते. तरं स्विफ्ट कार कुडाळ हुन गोव्याच्या दिशेने वाहतूक करतं होती. यावेळी दुचाकी स्वार सावंत यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला वं ती स्विफ्ट कारला जाऊन धडकली. याबाबत कार चालक या लक्ष्मीकांत मंगेश रेंगे (रा. कुडाळ) यांनी अपघाताची माहिती दिली. तर जखमी असलेल्या श्री. सावंत यांना उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू ते गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे अमंलदार लक्ष्मण काळे यांनी दिली.