सावंतवाडी,दि.११ जुलै
शहरातील मोती तलावात पुन्हा एकदा भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाले आहे. केशवसुत कट्ट्यावर बसलेल्या नागरिकांचा निदर्शनास ही मगर आली. केशवसुत कट्टा परिसरातील काँक्रीटच्या चौथऱ्यावर बसलेल्या या मगरीचे छायाचित्र अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपले.
मात्र, तलावात पुन्हा एकदा मगर दिसून आल्याने नागरिकांमधे घबराट पसरली आहे. सावंतवाडी शहराच्या सौंदर्याचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाच्या सौंदर्याची स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांनाही भुरळ पडत असते. मात्र, अलीकडे याच मोती तलावात मगरींचे दर्शन होऊ लागले आहे. मात्र पावसाळ्यात पुन्हा एकदा मोती तलावात मगरी आल्या असाव्यात असे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.