वरवडे येथील मृणाली कुंभार हिचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश…

चार्टर्ड अकाउंटंट अमोल खानोलकर यांचे लाभले मार्गदर्शन; मृणाली कुंभार हीचे सर्वच स्तरातून होतय कौतुक

कणकवली दि.११ जुलै(भगवान लोके)

दोडामार्ग -हेवाळे बाबरवाडीची मूळची,सद्या वरवडे,
फणसनगर येथील कु.मृणाली मोहन कुंभार हीने द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (The Institute of Chartered Accountants of India) च्या चार्टर्ड अकाउंटंट फायनल परीक्षेत ६०० गुणांपैकी ३०१ गुण मिळवत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.त्याबद्दल मृणाली कुंभार हीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मृणाली कुंभार हिचे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण- एस एम हायस्कूल, कणकवली तर उच्च माध्यमिक शिक्षण- कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे इयत्ता बारावी सर्व शाखांमधून प्रथम आली होती. एम कॉम- मुंबई विद्यापीठ कणकवली कॉलेज मध्ये पूर्ण केलं.त्यानंतर गरवारे कॉलेज, पुणे येथे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत तिने यश मिळवले आहे.कणकवली येथील चार्टर्ड अकाउंटंट अमोल खानोलकर यांचे मृणाली कुंभार हिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मृणाली कुंभार हिचे वडील मोहन कुंभार राजापूर कुंभवडे येथे उच्च माध्यमिक वाणिज्य कॉलेजमध्ये शिक्षक कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे,आई वडिलांनी आपल्याला प्रोत्साहन व मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याला यश संपादन करता आले असल्याची प्रतिक्रिया मृणाली कुंभार हिने दिली.