प्रा. मधु दंडवते यांचे नाव तसेच रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून येत्या २६ जानेवारी रोजीउपोषण करण्यात येणार

सावंतवाडी दि.२३ जानेवारी 

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावे आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनस ला द्यावे तसेच रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेच्या मार्फत उपोषण करण्यात येणार आहेत अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांनी दिली
अँड संदीप निंबाळकर व सचिव विहीर मठकर म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस मंजूर झाले असून दोन टप्प्यांमध्ये या टर्मिनसचा विकास होणार होता पहिल्या टप्प्याचा निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला तर दुसऱ्या टप्प्याचा निधी परत घेण्यात आला तो देऊन टर्मिनस जलद गतीने व्हावे अशी आमची मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या टर्मिनसचे आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले होते असे त्यांनी बोलताना सांगितले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५ रेल्वे गाड्या धुळ उडवत जात आहेत मात्र जिल्ह्यातील एकाही स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे यासाठी जिल्ह्यातील प्रमुख स्थानकावर या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशीही आमची मागणी आहे तसेच टर्मिनस सावंतवाडी येथे झाल्यात कल्याण सावंतवाडी च्या मार्गावर नवीन गाड्या सुरू होतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला
कोकण रेल्वेच्या प्रमुखांनी आंदोलनाची दखल घेतली असली तरी मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने आंदोलन हे निश्चित आहे तसेच टर्मिनस च्या नामकर्णाबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घातले होते आता त्यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी टर्मिनस चे नामकरण करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ठराव घ्यावा अशी देखील मागणी आहे असे त्यांनी बोलताना सांगितले