कुडाळ, दि.११ जुलै
भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आज मोफत वह्या वाटपचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उत्तमोत्तम दर्जेदार शिक्षण घेऊन गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत व्हा व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, तालुका सरचिटणीस राजेश पडते, तालुका महिला उपाध्यक्षा प्रज्ञा राणे, महिला शहराध्यक्षा मुक्ती परब, नगरसेवक निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर आणि शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले.