अँथोनी डिसोजा यांचे निधन

सावंतवाडी,दि.१२ जुलै
शहरातील सालईवाडा (शिरोडा नाका) येथील रहिवासी व टुर व्यावसायिक अँथोनी ऊर्फ टोनी पॉल डिसोजा (६५) यांचे ७ जुलैला निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नात असा परिवार आहे. महिला बालकल्याण सिंधुदुर्ग विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी अल्का डिसोजा यांचे ते पती तर ट्रॅव्हल व्यावसायिक पॉल डिसोजा व ऑस्टिन डिसोजा यांचे ते वडील होत.