सावंतवाडी,दि.१२ जुलै
पागावाडी ओहोळावरील ब्रीजची उंची वाढविण्याचे काम अर्धवट स्थितीत राहिले आहे. ते तात्काळ पूर्ण करावे. या कामामुळे या भागातील स्ट्रीटलाईट बंद झाली आहे. त्यामुळे तात्काळ काम करण्याची मागणी इन्सुली पागावाडी, सावंतवाडी ते मुळीकवाडा, ख्रिश्चनवाडा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. उपसरपंच कृष्णा सावंत, रश्मी सावंत, वैशाली नाईक, समृद्धी गावडे, विशाल पेडणेकर, कविता सावंत, समीक्षा सावंत, माधवी नाईक, दीप्ती सावंत, श्री. फर्नांडिस, दीपा सावंत, जोनिता मेरी फर्नांडिस, मनीषा शेळके आदी ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.