मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची आता सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून माठेवाडा प्रभागात मोफत सुविधा

सावंतवाडी,दि.१२ जुलै

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा सावंतवाडी शहरातील नगरपरिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आज पासून करण्यात आली आहे
सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर २ माठेवाडा येथे अंगणवाडी अंगणवाडीमध्ये ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे यामध्ये माठेवाडा सालईवाडा, जुना बाजार, मच्छी मार्केट, उभा बाजार या भागातील महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन आडिवरेकर यांनी केले आहे
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 31 ऑगस्ट ची मदत देण्यात आली आहे दरम्यान ही साईट अनेक वेळा स्लो होत असल्याने अर्ज भरण्यास महिलांची गर्दी होत आहे ही गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रभागांमध्ये महिलांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळण्याकरिता आडिवरेकर यांनी आपल्या प्रभागांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची विनामूल्य सुविधा करण्यात आली आहे