अंगणवाडी ताई आणि सेविकांसाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धा

वेंगुर्ला,दि.१२ जुलै

अंगणवाडीताई आणि सेविका या बाल मनावर संस्कार करण्याचे कार्य करीत असतात. अगदी कमी मानधन असले तरी बाल मानसशास्त्र जपत लहान मुलांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे ही कार्य करीत आहेत. अशा सर्व आजी-माजी अंगणवाडी ताई आणि सेविकांसाठी वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने आणि दाभोली येथील कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंचाच्या सहकार्याने खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
निबंध लेखनासाठी ‘बालसंस्कार काळाची गरज‘ यावर किमान ७०० तर कमाल १००० शब्दांमध्ये महिलांनी आपले मत संबंधित विषयावर मराठी भाषेत व्यक्त करायचं असून सोबत मुख्याध्यापक किवा सरपंच यांचा अंगणवाडी ताई किवा अंगणवाडी सेविका असल्याबाबत शिफारस पत्र जोडणे अनिवार्य आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रूपये १०००, ७००, ५००, २५०, २५० प्रत्येकी चित्रफ्रेम, प्रमाणपत्र आणि मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. निबंध कागदाच्या एका बाजूला स्वःहस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा प्रा.डॉ.सचिन वासुदेव परूळकर, मु.पो.तुळस, ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, पिन-४१६५१५ या पत्त्यावर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.