वेंगुर्ला प्रतिनिधी-
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात गेल्या ३ टर्ममध्ये निवडून येऊन सुध्दा सावंतवाडी मतदार संघात वा वेंगुर्ला तालुक्यात विकासात्मक बदल झालेला आढळलेला नाही. कारण आजही अतिवृष्टी थोड्याफार प्रमाणांत झाली तरी बाजारपेठ किंवा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे वेळागर असेल या ठिकाणी कुठलीही पिण्याच्या पाणी व्यवस्था वा पाणी निच-याची व्यवस्था केलेली नाही. तसेच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुध्दा आतापर्यंत वेंगुर्ला तालुक्यासाठी किवा सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी पोकळ आश्वासनांचे गाजर दाखविण्याचे काम सध्याच्या आमदारांनी केलेले आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी स्थानिक व सक्षम नेतृत्वाची गरज आजही विधानसभा मतदार संघातील मतदारांना भासत आहे, असे ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब यांनी स्पष्ट केले.
येथील शिवसेनेच्या तालुका मध्यवर्त कार्यालयात विधानसभा निवडणूक संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब बोलत होते. यावेळी उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, तुळस विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, शाखा प्रमुख हेमंत मलबारी, ओबीसी शहर प्रमुख संदिप केळजी, युवा सेना तुळस विभाग संघटक अनंत गोंधळेकर, युवासेना उपप्रमुख श्रीधर पंडीत, वजराट उपसरपंच श्यामसुंदर पेडणेकर, अभिनय मांजरेकर, दिलीप राणे आदी उपस्थित होते.
विधानसभेची निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाईल कि पक्षानुसार उमेदवार देऊन लढविली जाईल या पत्रकारांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सावंतवाडी विधान सभा मतदार संघांची निवडणुक लढविली जाणार आहे. गेल्या तीन टर्ममध्ये युतीच्या माध्यमातून निवडणुक लढविताना शिवसेनेचाच उमेदवार या मतदार संघात निवडणुकिस उभे राहिलेले होते आणि मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले आहेत. कारण या मतदार संघात शिवसेनेने तळगाळापर्यंत मजबुत संघटना बांधलेली आहे. आता ती आजही संघटना सक्षम आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची निवडणुक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच मतदार संघातील तिन्ही तालुक्यात संफ असलेला उमेदवार निवडणुक लढवेल असे यशवंत परब यांनी स्पष्ट केले.
सिंधुरत्ने योजना युती शासन काळात महाराष्ट्र शासनाने सुरू केली. पण गेल्या दोन वर्षात या योजनेचा लाभ सावंतवाडी मतदार संघातील कुणालाही झालेला नाही. आरवली, सागरतीर्थ, आसोली-फणसखोल या भागातील काही क्षेत्र हे मायनिंग माफियांच्या घशात घालण्याचे षडयंत्र आज काही सत्ताधारी करत आहेत. परंतु स्थानिक शेतक-यांच्या संघर्ष समिती बरोबर उध्दव बाळासाहेब ठाकरें शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी शेतक-यांच्या पाठीशी ठाम रहाण्याचा निर्धार केलेला असल्याचे यशवंत परब यांनी सांगितले.