वेंगुर्ला,दि.१२ जुलै
विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा असे प्रतिपादन सारस्वत बँकेचे संचालक सुनिल सौदागर यांनी गुणगौरव सोहळ्यात केले.
वेंगुर्ला तालुक्यातील गौड सारस्वत समाजातील १०वी, १२वी तसेच पदवी/ पदवीका परिक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गौड सारस्वत ब्राम्हण समाज, वेंगुर्लामार्फत स्वामिनी मंगल कार्यालय येथे पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, उपाध्यक्ष दिगंबर नाईक, ज्येष्ठ सारस्वत प्रकाश रेगे, संजय पुनाळेकर, अमोल आरोसकर उपस्थित होते.
यावेळी इयत्ता १०वीतील अनुष्का पराडकर, साक्षी प्रभूखानोलकर, सोहम प्रभूखानोलकर, आदिती राजाध्यक्ष, गणेश सामंत, युगंधर दाभोलकर, प्रथमेश प्रभूतेंडोलकर, निधी प्रभू-झांट्ये, मयूरेश सामंत, अनंत नाईक, दुर्वांक कामत, मुकेश शेणवी या विद्यार्थ्यांचा त्यानंतर बारावीतील साक्षी चिटणीस, सर्वदा सामंत, कांचन प्रभूखानोलकर, प्रतीक कामत, देवयानी कामत, भक्ती पुनाळेकर इत्यादी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सौ. स्नेहा सुहास प्रभू-महांबरे पुर्वाश्रमीच्या मीना पडवळ यांचा त्यांनी गोवा विद्यापिठाची विशेष पदवी संपादन केल्याबद्दल मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पुनाळेकर तर आभार तृप्ती आरोसकर यांनी मानले. या कार्यक्रमास गौड सारस्वत ब्राह्मण समाज, वेंगुर्लाचे पदाधिकारी, समाजातील बंधु-भगिनी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.