मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर

वेंगुर्ला,दि.१२ जुलै

विश्व हिदू परिषद सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, कुंभार टेंब युवक कला क्रीडा मंडळ तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे १३ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत तुळस येथील उत्सव मंगल कार्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरात मुंबई येथील प्रतिथयश डॉक्टर्स सेवा देणार आहेत. रोग निदान झाल्यावर त्यावर रुग्णांना मोफत औषधे दिली जाणार आहेत. या शिबीरात फिजिशियन अण्ड अन्योलॉजिस्ट एम.डी.डॉ.दिलीप पवार, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रोहन कुलुर, एम.बी.बी.एस.व एम.डी.डॉ.शामला कुलुर, नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ.शाम राणे, दंतरोग चिकित्सक डॉ.किशोर धोंड आणि अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.शरद चव्हाण आदी डॉक्टर सेवा देणार आहेत. इच्छुक रूग्णांनी प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३), नितीन चव्हाण, शंकर घारे, विजय रेडकर, सत्यविजय गावडे, कमलेश गावडे, ज्ञानेश्वर केळजी, संतोष गावडे, राजबा सावंत यांच्याकडे नावनोंदणी करावी.