देवगड,दि.१२ जुलै
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेत बापर्डे सरपंच संजय लाड यांनी आतापर्यत बापर्डे गावातील ८७ फॉम स्वतः ऑनलाईन केले आहे .
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेत प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून लाभार्थाना लाभ व्हावा यासाठी नियोजन केले आहे . यात बापर्डे सरपंच संजय लाड यांनी कार्य तत्पर आमदार मा.नितेशजी राणे याच्या सूचने नुसार विशेष मोहीम हाती घेत आतापर्यत बापर्डे गावातील ८७ फॉम स्वतः ऑनलाईन केले असुन बापर्डे गावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे ऑनलाईन करणार असल्याचे ध्येय असुन सामाजिक बांधिलकीतुन आपण स्वतः ग्रामपंचायतीमध्ये व गावात जाऊन आपण स्वतः ऑनलाईन फॉम भरत असुन बापर्डे ग्रामपंचायतीमध्येही फॉम भरण्यासाठी वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे
बापर्डे सरपंच संजय लाड यांच्या या सहकार्यामुळे बापर्डे गावातील लाभार्थी समाधान व्यक्त करत आहेत .