जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन
देवगड,दि.१२ जुलै
वाढदिवस हे निमित्त असून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा ,क्षेत्रात कार्य करीत असताना सर्वसामान्य जनतेची सेवा व्हावी हाच हेतू असतो .आणि हा हेतू ठेवून ज्यावेळी गुणवंतांचा सत्कार केला जातो तेव्हा निश्चितपणे त्यांच्या सन्मान हा त्यांच्या गुणवत्तेला दाद देणे अशा उद्देशाने असे उपक्रम घेतले जातात. आपल्या वाढदिवसाच्या ओचित्य साधून देवगड तालुक्यातून दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि तालुक्यात १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांचा सन्मान सन्मान करणे हा महत्त्वाचा हेतू ठेवूनच आजचा हा गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात बोलताना केले.
यापुढे बोलताना ते म्हणाले देवगड तालुका निसर्ग संपन्न साहित्यिक,तीर्थक्षेत्र, किल्ले, त्याचबरोबर येथील बागायतीने समृद्ध तालुका असून संपूर्ण कोकणात या तालुक्याचा नावलौकिक आहे .संपूर्ण कोकण विभागात शैक्षणिक क्षेत्रात घोड दौड सुरू असून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे व यात मुलींची गुणवत्ता हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे.. या पुढील काळात देखील गुणवंत विद्यार्थी यांनी अधिकाधिक वाचन करून स्पर्धा परीक्षेत सहभाग घेवून नावलौकिक वाढवावा. असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना बोलताना दिला. शिक्षण संस्थेत शैक्षणिक दर्जा टिकविणे व तो उंचावणे हे महत्त्वाचे असते व तेच कार्य १०० टक्के निकाल देणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी जोपासले असून त्यांच्या पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते.संदेशभाई पारकर यांचा१४ जुलै वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध सामाजिक, कला क्रीडा, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रमांनी १२ ते १४ जुलै २०२४ साजरा होत आहे .या अनुषंगाने देवगड, तालुक्यांत साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त
शुक्रवार दिनांक १२जुलै रोजी
देवगड तालुक्यातील –
१०वी आणि १२ वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या शिक्षण संस्थांचा सन्मान स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे रोजी आयोजित करण्यात आला होता
छत्रपती शिवाजी महाराज,स्व.बाळासाहेब ठाकरे, याना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दिपप्रज्वलजनाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.या वेळी व्यासपीठावर सिधुदुर्ग जिल्हा प्रमुख संदेश पारकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम,सायली घाडीगावकर,माजी सभापती रविंद्र जोगल,माजी उपसभापती संजय देवरुखकर उपस्थित होते.
या निमित्ताने इ १० व १२ वी मधील गुणवन्त विद्यार्थी तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या विद्यालयाचा सन्मान जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.