प्रभु श्री राम यांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा निमित्ताने बसस्थानक जवळील राम मंदिर येथून बाजारपेठ बंदर जेटी मार्गांवर राम भक्तांच्या उपस्थितीत रॅली

मालवण,दि.२४ जानेवारी
अयोध्या नगरी येथे प्रभु श्री राम यांचा नवनिर्माण मंदिरातील प्राणप्रतिष्ठापणा सोहळा निमित्ताने देशात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मालवण शहरातही बस स्थानक जवळील राम मंदिर येथून बाजारपेठ बंदर जेटी मार्गांवर राम भक्तांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. राम नामाच्या जयजयकाराने मालवण नगरी दुमदुमून गेली.

यावेळी प्रभू श्री राम, सीतामाई, लक्ष्मण तसेच हनुमान वेशभूषा साकारत निघालेला चित्ररथ लक्षवेधी ठरला.

मोठ्या संख्येने राम भक्त तसेच तरुणाई या पायी रॅलीत सहभागी झाली. सायंकाळी उशिरा सुरु झालेल्या या रॅलीची सांगता रात्री बंदर जेटी येथे करण्यात आली.