सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आंबा उत्पादक आणि आंबा व्यवसायिक सदस्यांची सभा 24 जानेवारी रोजी

मालवण,दि.२४ जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यवसायिक सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेच्या आंबा उत्पादक आणि आंबा व्यवसायिक सदस्यांची तसेच इतर आंबा व्यवसायिक यांची सभा बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वाजता श्री दत्त मंदिर भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत थ्रीप्स रोगावर प्रभावी कीटकनाशक तसेच सरकारकडून
अवकाळी पावसामुळे करपलेला मोहर आणि निसर्गात होणारे आकस्मिक बदल यामुळे होणारे नुकसान यांचे पंचनामे वेळेवर होणे बाबत तसेच उद्भवणाऱ्या कीडिंचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक प्रभावी मार्गदर्शन पुरवण्यासंदर्भात मागणी केली जाणार आहे. तसेच मच्छीमारांना मिळणाऱ्या इंधन परताव्याप्रमाणे (पॉवर स्प्रेअर साठी लागणारे पेट्रोल)परतावा मिळण्यासंदर्भातही मागणी केली जाणार आहे. बोगस कीटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यावरही कारवाही करण्याची मागणी केली जाणार आहे. या सभेस सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग यांनी केले आहे