कणकवलीत २६ जानेवारी रोजी उपरकर कुटुंबीयांचा त्रैवार्षिक गोंधळ

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आगमन ;२० – २० डबलबारी भजनाचा जंगी सामना

कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)

शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजल्यानंतर उपरकर बंधू कुटुंबीयांचा भवानी देवीचा गोंधळ होणार आहे. भाविकांनी सायं. ९ वाजल्यानंतर गोंधळाचे दर्शन आणि महाप्रसादाचा वाटप करण्यात येणार आहे.सायंकाळी ५ वाजता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्व भक्तांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

शनिवार दि. २७ जानेवारी २०२४ रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.सर्व भक्तांनी दुपारी ३.०० नंतर तीर्थप्रसाद व दर्शन होणार आहे.त्यानिमित्त २० – २० डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा अभिषेक शिरसाठ श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ (हरकुळ बुद्रुक, ता. कणकवली) विरुद्ध गुरुवर्य बुवा – प्रमोद हर्याण यांचे शिष्य पखवाज साथ – श्री. रुपेश परब , तबला साथ – श्री. अभिषेक सुतार विरुद्ध बुवा :- श्री. अरुण घाडी श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पावशी गुरुवर्य – श्री. प्रदिप पांचाळ पखवाज- श्री. विनीत धुरी , तबला- श्री. बाळा परब आयोजित करण्यात आला आहे,असे आवाहन उपरकर कुटुंबीयांनी केले आहे.