सोशल मीडियावर औरंगजेब चा स्टेटस लावल्यावरून वेंगुर्लेमध्ये तणाव : हिंदू बांधव एकवटले

वेंगुर्ले,दि.२३ जानेवारी

औरंगजेबचा स्टेटस एका युवकाने लावल्याने वेंगुर्ले शहरात वाद उद्भवला असून मोठ्या संख्येने हिंदू बांधव वेंगुर्ले पोलीस ठाण्यात एकत्र आले आहेत
या युवकाने काल अयोध्या येथील राम मंदिर प्रतिष्ठापना दिवशी काल हा स्टेटस लावला असून. ही समाज विघातक कृती आहे. या मागणीसाठी आज भाजप युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर तसेच हेमंत गावडे, हितेश धुरी, प्रवण वायंगणकर तसेच सनी मोरे, सुधीर पालयेकर, चतुर पार्सेकर, प्रणव गावडे, योगीराज पाटील, सरपंच पपू परब यांच्या सह मोठ्या संख्येने युवक जमले असून गुन्हा दखल करावा अशी मागणी होत आहे.