मालवण,दि.२३ जानेवारी
अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात काल मनसेच्या वतीने श्रीराम मंदिर मेढा, मालवण येथे मनसेच्या वतीने सोमवारी महाआरती व तीर्थ प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. श्री राम मंदिर येथे मंदिर देवस्थान मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजीत केले गेले होते.
मनसेच्या वतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मालवण शहरातील श्रीराम भक्त आणि नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष गणेश वाईरकर, मालवण तालुका अध्यक्ष प्रीतम विलास गावडे मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, माजी उपशहर अध्यक्ष गुरू तोडणकर, माजी उपशहर अध्यक्ष आबा आडकर, मनविसे पदाधिकारी भाग्यश्री लाकडे उपस्थित होते.