कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)
अयोध्या मध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त श्री देव गांगोचाळा लोरे नं १ येथे ग्रामस्थ आणि रामभक्त यांच्या मार्फत दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य दिव्य श्रीरामाची प्रतिकृती दर्शवणारी रांगोळी काढत सर्वांचेच लक्ष वेधण्यात आले होते.
प्रथम श्रीची व प्रभू रामाच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक करण्यात आला.अथर्वशीर्ष व रामरक्षापठण महाआरती करण्यात आली. तसेच ग्रामस्थ आणि राम भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सांयकाळी मंदिरामध्ये दीपोत्सव करण्यात आला.तसेच प्राथमिक शाळा लोरे गुरववाडी मुलांचा रेकॉर्ड डान्स ठेवण्यात आला होता.त्यांचा गावच्या वतीने सत्कार केला गेला. कोकणातील नामवंत भजनी बुवा श्री. विनोद चव्हाण यांच्या सुस्वर भजनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. तसेच या शुभदिनी लोरे भाजपा यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण संभारंभ गांगोचाळा मंदिरामध्ये पार पडला. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सलोनी महेश गुरव द्वितीय क्रमांक दिव्या दिवाकर गुरव तृतीय क्रमांक क्रांती तुषार रावराणे चर्तुर्थ क्रमांक निधी शिरोडकर पाचवा क्रमांक सुविधा जयदास तांबे हे स्पर्धक विजयी झाले. प्रथम क्रमांक रुपये ३०००/- द्वितीय क्रमांक रुपये २०००/- तृतीय क्रमांक रुपये १०००/- आणि उतेजनार्थ रुपये ५००/- आणि प्रत्येकी सहभाग घेतलेल्या स्पर्धकाला रुपये १००/- अशी पारितोषिक देण्यात आली. संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी व रामभक्तानी या कार्यक्रमात बहुसंख्येने सहभाग घेतला होता संपूर्ण गाव राममय झाले होते.गावातील वातावरण आनंदात आणि उत्सवात न्हावून निघाले होते. प्रत्येक घरात रांगोळी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.रामनामाचा जप संपूर्ण दिवस चालू होता.