हिंदू धर्मियांची मने दुखावणारे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल वेंगुर्ल्यात तणाव निर्माण

शहरातील शेकडो हिंदू धर्मीय वेंगुर्ला पोलीस ठाण्यावर एकवटले

वेंगुर्ला, दि.२३ जानेवारी

औरंगजेब अखंड हिंदुस्थानचा बादशदा सहित हिंदू धर्मियांची मने दुखावणारे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल मंगळवार २३ जानेवारी रोजी वेंगुर्ल्यात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी शहरातील शेकडो हिंदू धर्मीय वेंगुर्ला पोलीस ठाण्यावर एकवटले होते.
याबाबत भाजप युवा मोर्चा व हिंदू युवकांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, काल दिनांक २२/०१/२०हिंदू धर्मियांची मने दुखावणारे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल२४ रोजी राम प्राणप्रतिष्ठापन सोहळा संपन्न होत असताना वेंगुर्ला शहरातील काही हिंदू विरोधक व समाजातील समाजकंटक यांनी इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सअॅप या सोशल मिडीयावर हिंदूंच्या भावना दुखावणारे स्टेटस स्टोरीला लावल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी अशा हिंदू विरोधक व समाजकंटकांवर आपलेकडून योग्यती कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. तसेच असे स्टेटस कोण फिरवत आहेत या मागचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान वेंगुर्ला पोलीस ठाण्यावर हिंदू धर्मीय शेकडोच्या संख्येने एकवटले होते. यावेळी जय श्री राम, हिंदू धर्म की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय आशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान यावेळी मच्छिंद्र प्रताप मोरे यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार फातिमा जाफर शेख व शाहिद महम्मद हनिफ नदाफ या दोन युवक व युवतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणा मागील मुख्य सूत्रधार यांच्यावर जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचा पवित्रा शेकडोंच्या जमावाने घेतला. दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झालेले हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सुरू होते.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील डुबळे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, हितेश धुरी, भूषण सारंग, परबवाडा उपसरपंच पपू परब, प्रीतम सावंत, भाई मालवणकर, अमित म्हापणकर, पंकज शिरसाट वृंदा मोर्डेकर, रवी शिरसाट, प्रणव गावडे, सुधीर पालयेकर, चतुर पार्सेकर, अमित म्हापणकर, वैभव होडावडेकर, साई भोई यांच्यासाहित शेकडो हिंदू धर्मीय वेंगुर्ले पोलीस स्थानकाच्या आवारात उपस्थित आहेत.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी जमवाबरोबर चर्चा करून जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान शाहिद महम्मद हनिफ नदाफ याने सोशल मीडियावर हंबीरराव मोहिते या मराठी चित्रपटाचा व्हिडीओ एडिट करून त्यामध्ये “औरंगजेब पुरे हिंदुस्थान का बाप है” असे वक्तव्य असलेला ओट्स अप स्टेटस ठेऊन प्रसारित केला. तर फातिमा जाफर शेख हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर जुन्या बाबरी मस्जिद चा फोटो व “वक्त हमरा आयेगा तबा सर धड से अलग कर दिये जयेंगे” आशा मजकुराची स्टोरी ठेवली. यावरून वेंगुर्ले येथे हा वाद पेटला. दरम्यान यावरून मोरे यांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.