उन्हाळ्यात मिरचीला दराचा तडका बसत असल्यामुळे;ऐन थंडीतही देवगड वासियांनी झुंबड…
देवगड, दि.२३ जानेवारी(गणेश आचरेकर)
वर्षभराच्या बेगमीचा मसाला करण्यासाठी घराघरात लगबग सुरू आहे.मिरची खरेदीसाठी देवगड मांजरेकर नाका येथे महिलांची झुंबड उडाली आहे.लाल भडक दर्जेदार मिरची अडीचशे ते तीनशे रुपये दराने मिळत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणात बहुतांश वर्षभरासाठी लागणारा मसाला उन्हाळ्यात केला जातो परंतु उन्हाळ्यात या मिरच्यांचे दर गगनाला भिडत असल्यामुळे अन थंडीतही लाल मिरची घेण्यासाठी देवगड वासियांनी चांगलीच झुंबड उडाली आहे उन्हाळ्यात असलेल्या तुलनेत यावेळी मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीचे दर फारच कमी झाले आहेत संकेश्वरी मिरची 300 रुपये आणि लाल तिखट मिरची 250 रुपये किलोने चांगल्या दर्जाची मिरची मिळत असल्याचे बोलले जात असल्यामुळे नागरिकांची चांगली झुंबड उडाली आहे.