जिल्ह्यात प्रथमच रामचरित्रावर आधारित नृत्यस्पर्धेचे आयोजन
गाव जपणारी माणसं चिंदर मध्ये! भाजप नेते निलेश राणे
आचरा,दि.२३ जानेवारी (अर्जुन बापर्डेकर)
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित श्रीरामचरित्रावर आधारित नृत्य स्पर्धेत दिक्षा नाईक हिने प्रथम क्रमांक मिळवला.तर समूह गटात चिमणी पाखरे गृपने बाजी मारली.
चिंदर रामेश्वर मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली. यावेळी चिंदर वासियांचे ऐकतेचे दर्शन बघून निलेश राणे भारावले. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले कि चिंदर गावात गावपण जपणारी माणसं राहतात हे पाहून आनंद वाटतो असे गौरवोदगार काढले.
या स्पर्धेत
एकेरी गटात-कु. दिक्षा नाईक-कुडाळ प्रथम क्रमांक मिळवीला तीला रोख 5000 रुपये आणि चषक देऊन, कु. मृणाल सावंत, कुडाळ -द्वितीय मिळवीला तिला रोख 3000 रुपये आणि चषक देऊन, कु. दिया लुडबे, मालवण-तृतीय क्रमांक मिळवीला तिला रोख 2000 व चषक देऊन तर प्रथम उत्तेजनार्थ कु. विवेक सावंत, कणकवली याला रोख 1000 रुपये व चषक तसेच द्वितीय उत्तेजनार्थ कु. रेवा जोशी, मालवण हिला रोख 1000 रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.
नृत्य स्पर्धेत समूह नृत्य प्रकारात चिमणी पाखर-कुडाळ यांना प्रथम क्रमांकाचे रोख 10,000 व चषक देऊन, RDX सावंतवाडी यांना द्वितीय क्रमांकाचे रोख 7000 रुपये व चषक तसेच नंदिनी कलामंच हिंदळे यांना तृतीय क्रमांकचे रोख 5000 रुपये आणि चषक देऊन, तर परफेक्ट बेस्ट ग्रुप देवगड-प्रथम उत्तेजनार्थ रोख 2000 व चषक व बालसंघ -चिंदर-द्वितीय उत्तेजनार्थ क्रमांकाचे 2000 व चषक मान्यवाराच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेते सुदिन तांबे व कोरिओग्राफर सौ. प्राची राणे यांनी काम पाहिले तर बहारदार निवेदनाने बांदल चौधरीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाने शेवट पर्यंत खिळवून ठेवले. स्पर्धेसाठी बाबू कदम यांनी मेहनत घेतली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दीपक सुर्वे, जान्हवी घाडी,पोलीस पाटील दिनेश पाताडे, मधुकर पाताडे, विकास पाताडे, संतोष गावकर, संतोष कोदे, मंगेश गावकर, दिगंबर जाधव, देवेंद्र हडकर, सुबोध गावकर, शेखर पालकर, शशी नाटेकर, अरुण घाडी, भाई तावडे, बाबू पाताडे, मीना कावले, भाई अपराज आदी उपस्थितीत होते.