रेल्वे टर्मिनस आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी दि.२४ जानेवारी
येत्या २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिन मळगाव रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी टर्मिनस होण्यासाठी मोठ्या जन आंदोलनाची सुरुवात होत असून या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

स्वर्गीय माजी आमदार जयानंद मटकर यांनी या प्रश्नावरती 2007 पासून या प्रश्न प्रचंड जन आंदोलन उभारलं होतं काही स्वार्थी लोकांनी याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग केला आज या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सुमारे 16 वर्ष हा प्रश्न प्रलंबित ठेवला पुन्हा हे जना आंदोलन करण्यासाठी शहरातील काही तरुण एकत्र आले यामध्ये स्वर्गीय जयानंद मटकर यांचे नातू मिहीर मटकर सागर तळवडेकर सागर नानोसकर भूषण बांदिवडेकर तेजस पोळेकर या तरुण पिढीने याचा शिव धन उचलला आहे ज्यांना समर्थ साथ देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे टर्मिनल्स होण्यासाठी आसपासच्या गावातील लोक तसेच सावंतवाडी शहरवासीयाने मोठ्या संख्येने सहभागी सहभागी व्हा असे आव्हान माजी नगराध्यक्ष सावंतवाडी यांनी केले आहे