संजय गांधी निराधार योजनेसाठी वाढीव उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा वाढवून देण्यात यावी-तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर

देवगड, दि.२४ जानेवारी
संजय गांधी निराधार योजनेसाठी वाढीव उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी पत्रा द्वारे केली आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थ्यांना दारिद्र्य रेषेखालील दाखला नसेल तर पूर्वी पासून तहसीलदार साहेब यांचा वार्षिक उत्पन्न दाखला २१,०००/- पर्यंत आहे परंतु सध्या लाभार्थ्यांनी दाखला २१,०००/- पर्यंत मिळत नसल्यामुळे अपंग, श्रावणबाळ ,वृद्धापकाळ, निराधार अशा विविध योजना पासून लाभार्थी वंचित होत आहेत. तरी आपल्या स्तरावर योग्य ती उचित कार्यवाही करण्यात येऊन किमान ४० हजार पर्यंत उत्पन्नाचे दाखल्याची अट लागू केल्यास जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभ घेता येईल तरी याबाबत आवश्यक ते योग्य कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी मागणी किंजवडेकर यांनी केली आहे.