कवठी येथील शेखर मेस्त्री दिल्लीला प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित

 सूक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रयलामार्फत निमंत्रित मंत्री नारायण राणे याचे आभार

कुडाळ, दि.२४ जानेवारी (विठ्ठल राणे)

नवी दिल्ली येथिल कर्तव्य पथावर साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास  कवठी येथील श्री चंद्रशेखर बाळकृष्ण मेस्री यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजने मधून नोंदणी केलेल्या श्री मेस्त्री यांना सूक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रयलामार्फत निमंत्रित करण्यात आले या मधे त्यांना गोवा येथील दाभोळी विमानतळावरुन दुपारी १.३५ मिनिटांनी दिल्ली येथे विमानाने प्रवास केला.26 जानेवारी रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहून याची देहि याची डोळा हां कार्यकर्म बघता येणार आहे .या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाल्याने मेंस्त्री यांनी या मंत्रालयाचे व या मंत्रालायचे मंत्री श्री नारायण राणे याचे आभार मानले त्याच प्रमाणे या करीता साहकार्य केलेले कवठी सरपंच स्वाती करलकर सदस्य प्रमोद नाईक माजी उपसरपंच भारत मेस्त्री मंडल प्रमुख संजय वेंगुर्लेकर ,रणजीत देसाई संदेश नाईक चंदन कांबळी यांचे आभार मानले .