श्रीराम मंदिर मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच औचित्य साधून २९४० स्क्वेअर फूट मध्ये श्रीराम रांगोळी

सावंतवाडी,दि.२४ जानेवारी

नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या इन्सुली गावातील उत्कर्ष युवक मंडळ यांच्यावतीने श्रीराम मंदिर मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच औचित्य साधून २९४० स्क्वेअर फूट मध्ये श्रीराम रांगोळी काढण्यात आली. तब्बल ७००किलो रांगोळी आणि रंग यांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची भव्य रांगोळी साकारण्यात आली. यासाठी उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते सौ सुषमा पालव, अनिरुद्ध पालव यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण मुळीक,शुभम मुळीक,स्वामी पेडणेकर, विशाल पालव,निनाद पालव, स्वागत नाटेकर , नीशू पालव , अनिशा परब, प्रिया नाटेकर, रिया पालव, तेजू पालव,यशवंत गावकर,विशाल कोठावळे ,शुभम आईर,सूर्या सावंत यांनी कार्य केलं. मंडळाचा सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी मदत केली. सावंतवाडीसह इतर ठिकणांहून अनेक नागरिक ही रांगोळी बघण्यासाठी इन्सुलीत येत आहेत.