कार्यकारी अभियंत्यांची वागणुक चुकीची- परशुराम उपरकर

कणकवली दि.२४ जानेवारी(भगवान लोके)

कणकवली सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याशी केलेली वर्तणूक चुकीची आहे. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व नागरिकांची कसे वागावे? याबाबत एक आचारसंहिता आहे,माध्यमांशी थेट संवाद साधण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाची त्यांनी परवानगी घेण्याची आवश्यकता असते. आमच्या ज्या मागण्या होत्या त्याबाबत त्यांनी बोलणं टाळले. नौसेना दिनाच्या निमित्ताने केलेल्या कामाची माहिती न देताच चुकीच्या पद्धतीने देत आमची दिशाभूल केली आहे. त्यामुळे पुढील काळात त्या कार्यकारी अभियंत्यांची तक्रार मुख्यमंत्री, मुख्य सचिव व बांधकाम सचिव यांच्याकडे करणार असल्याची माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी मालवण शिष्टमंडळ आले होते. नौसेना दिनाच्या वेळी निधी खर्च केलेल्या जागेवर काम नाही,तुम्ही केलेल्या अंदाजपत्रक प्रमाणे काम नाही.माहिती अधिकारी यांनी सुनावणी लावली होती,त्यावेळी स्वतः मुंबई ला होते,शेवटी माहिती जे कर्मचारी होते त्यांचे कडून घेतली.अंदाज पत्रक,एम बी रेकॉर्ड आणि जाहिरात प्रसिद्ध मागितली आहे.काम होवून दीड महिना झाला माहिती मिळत नसल्याने विचारणा करण्यासाठी आम्ही गेलो होतो.त्यावेळी उडवाऊडवीची उत्तरे देत होते.रेल्वे स्टेशन कामाबद्दल हेरींग घेतली,मात्र भलतीच उत्तरे दिली.आपण अधिकारी असल्याचे भान न राखता कार्यकर्त्याच्या भावनेत कार्यकारी अभियंता बोलले.उपरकर यांनी चांगले कामांमध्ये सहकार्य करावे.उपरकर यांनी निधी आणावा हे सांगणे चुकीचे आहे.ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचे भाषेत बोलले,त्यांची वागणूक आणि त्यांनी दिलेली स्टेटमेंट याबाबत तक्रार करणार आहे.त्यांनी लक्षात ठेवावे,हे पनवेल कर्जत नाही.नागरिकांच्या कर आकारणी रूपाने जाणाऱ्या पैसाची विचारणा करण्याचा अधिकार हा अण्णा हजारे यांनी मिळवून दिला आहे.त्यांच्या दालनात दोन वेळा भेटीसाठी आणि तिने वेळा हेरिंगला गेलो.लोक कार्यालयात गेल्यावर हे मुंबई येथे असतात, लोकांना भेटत नसल्यास मुख्य सचिव,सचिव,मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे.माजी लोकप्रतिनिधी म्हणून मी गेलो त्यांचे हालचाल रजिस्टर पाहणार आहे.या विरोधात फेब्रुवारी महिन्यात आंदोलन करणार आहेत.टेंडर प्रक्रियेचे की त्यांच्याकडे आहे. कोणते काम कोणी करायचं हे तेच ठरवत आहेत.या कार्यकारी अभियंत्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार आहे .प्रसंगी लोक आयुक्त यांच्याकडे दाद मागणार असल्याचे श्री.उपरकर यांनी सांगितले.