ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप हिंदळेकर यांचा सत्कार

कणकवली दि.२४ जानेवारी(भगवान लोके)

संगीत सांप्रदायिक भजन संस्कृती संवर्धन संस्था हरकूळ बुद्रुक यांचा सहावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दिलीप हिंदळेकर यांना जाहीर झाल्याबद्दल दिलीप हिंदळेकर यांचा सत्कार करण्यात आला.

सहावा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यात सीमा प्रकाश पेडणेकर यांच्या स्मरणार्थ हळदी कुंकू समारंभ पार पडला.गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बुवा श्री अजित परब बुवा यांचे सुमधुर भजन झाले,त्यानंतर मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.

भजन संस्कृती जपण्यांबरोबरच सामाजिक भान ठेवून गावातील काही यशस्वी शास्त्रीय कला प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सन्मानपूर्वक सत्कार तसेच विशेष कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या संस्थेच्या वतीने करण्यात आला. व्यक्तिमत्व , निवृत्ती शिक्षक, ज्येष्ठ भजनी बुवा बाबा वर्देकर , कणकवली पंचायत समिती ग्राम विस्तार अधिकारी पदावर बढती मिळाल्याबद्दल प्रमोद ठाकूर, आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल अंजुमन खुद्दामुल मुस्लमीन उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नसरीन शहानवाज डांगे ,जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून गोविंद उर्फ पप्पू मोडक यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल,राज्यस्तरीय भजन स्पर्धा उत्कृष्ट झांज वादक म्हणून शंकर सावंत,हार्मोनियम मधील पाचवी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल मंथन गणेश चव्हाण ,मराठे गायन परीक्षा तिसरी प्रवेशिका पूर्ण केल्याबद्दल कुमारी चैत्राली ,गायन प्रारंभिक परीक्षा उत्तीर्ण स्वरांगी करबेळकर ,पखवाज मधील प्रथम परीक्षा उत्तीर्ण चैतन्य तांबे,सरपंच आनंद ठाकूर यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष श्री .पेडणेकर यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर गावचे उपसरपंच आयु पटेल , गोपी लाड, बुलंदजी पटेल,नित्यानंद चिंदरकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून भाऊ नाईक वेतोरे यांचे अध्यात्मिक प्रबोधनपर नारदीय कीर्तन सादर झाले.या कीर्तनाचा विषय सेतुबंध रामेश्वरी हा होता.

प्रास्ताविक संस्थेचे संतोष तांबे ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कदम सर यांनी केले तर आभार श्री भूषण वाडेकर यांनी मानले.