वाहन धारकांची गैरसोय बांधकाम विभाग यांच्या कारभारात तीव्र संताप
दोडामार्ग, दि. २४ जानेवारी
गोवा दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातील अवजड वाहने बंद करावी अशी मागणी करून देखील चंदगड बांधकाम विभाग तसेच चंदगड वाहतूक पोलिस याकडे लक्ष देऊन उपाययोजना करताना दिसत नाही त्यामुळे गेल्या चार दिवसांत अवजड वाहने अपघात होऊन घाट बंद होणे सुरू आहे. बुधवारी दुपारी तिलारी घाटात चार दिवसांपूर्वी लोखंडी सामान घेऊन जाणारा टेम्पो अपघात झाला होता हा टेम्पो काढण्यासाठी घाटात मोठी क्रेन आणली होती. हा टेम्पो काढताना चक्क क्रेन पलटी झाल्याने तिलारी घाट बंद होऊन दोन्ही बाजूंनी खाजगी वाहने एस टी बसेस अडकून पडल्या यामुळे मोठी गैरसोय झाली. घाटातील पनवती संपता संपेना बांधकाम विभाग यांच्या कारभारात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.