माजी आ.प्रमोद जठार यांची ओबीसी मंत्रालय मंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे मागणी
कणकवली दि.२४ जानेवारी(भगवान लोके)
वैश्यवाणी समाज हिंदूवैश्य ,हिंदूवाणी अशा जन्मदाखलावर नोंदी असणारा लोकांना ओबीसी दाखले मिळण्यास येणारा अडचणी सोडविण्याकरिता माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वात वैश्यवाणी ओबीसी कृती समिती अध्यक्ष सुनिल खाडये व सचिव विकास संसारे यांनी भेट घेवून ओबीसी मंत्रालय मंत्री ना.अतुल सावे यांना निवेदन दिले.यावेळी ओबीसी विभागाची बैठक लावून अडचणी सोडवा अशी मागणी केली आहे.