मालवण महसूल नायब तहसीलदार पदी श्रद्धा चौगुले यांची नियुक्ती

मालवण, दि.२४ जानेवारी

मालवण तहसील कार्यालय येथील महसूल नायब तहसीलदार पदी श्रद्धा महादेव चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2020 एमपीएससी बॅच च्या श्रद्धा चौगुले या इंजिनियर असून राष्ट्रीय खोखो खेळाडू आहेत. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर असून त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांची नियुक्ती मालवण महसूल नायब पदावर परिवेक्षाधीन कालावधीत झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारत सेवा सुरु केली आहे. गेले काही दिवस मालवण येथील महसूल नायब तहसीलदार पद रिक्त होते. या पदावर अखेर अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.