मालवण गटविकास अधिकारी पदी आत्मज मोरे यांची नियुक्ती

मालवण, दि.२४ जानेवारी

मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी गट अ पदी आत्मज मोरे (महाराष्ट्र विकास सेवा गट अ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2020 च्या एमपीएससी बॅच चे आत्मज मोरे यांनी परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक गटाविकास अधिकारी म्हणून मुरुड रायगड या ठिकाणी सेवा बजावली. त्यांचे मूळ गाव कराड सातारा आहे. ते मॅकॅनिकल इंजिनियर आहेत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय नुसार 22 जानेवारी पासून पुढे 29 आठवडे कालावधीसाठी गटविकास अधिकारी गट अ या पदाचा स्वतंत्र कार्यभारासाठी आत्मज मोरे यांना पदस्थापना देण्यात आली आहे.