बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने माझ्या मनातील राम या विषयावर आधारित विशेष निबंध स्पर्धेचे आयोजन

मालवण, दि.२४ जानेवारी

मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने माझ्या मनातील राम या विषयावर आधारित विशेष निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेसाठी ५०० शब्द मर्यादा आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १५०१ रुपये व प्रशस्तीपत्र, १२०१ रुपये व प्रशस्तीपत्र, १००१ रुपये व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ ५०० रुपयांची ५ पारितोषिके दिली जाणार आहेत.

ही स्पर्धा खुली असून १० वर्षावरील व्यक्तिस सहभागी होता येईल. स्पर्धकांनी आपले निबंध २८ जानेवारी २०२४ पर्यंत दीपक भोगटे- ९४२३८३३१६३ या नंबरवर व्हाट्सअप करावेत. किंवा advddp@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर ई-मेल करावेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ ३० जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष- किशोर शिरोडकर, कार्यवाह- लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष- शैलेश खांडाळेकर यांनी केले आहे.