माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा 26 जानेवारी रोजी मालवण नगरपरिषद समोर आमरण उपोषणाचा इशारा

मालवण, दि.२४ जानेवारी
मालवण शहरातील मेढा दोन पिंपळ जावकर घराजवळील गटार बांधणे व काँक्रिटीकरण काम करण्याबाबत संबंधित ठेकेदारास वर्क ऑर्डर देऊनही विहित मुदतीपेक्षा जास्त कालखंड झाला तरी ठेकेदार काम करत नसल्याने संतप्त बनलेल्या माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व
26 जानेवारी पर्यत काम सुरु न झाल्यास 26 जानेवारी रोजी मालवण नगरपरिषद समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे

मालवण शहरातील मेढा दोन पिंपळ जावकर घराजवळील गटार बांधणे व काँक्रिटीकरण काम करण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला हे काम देण्यात आले
संबंधित ठेकेदारास या कामाची वर्क ऑर्डर देऊनही विहित मुदतीपेक्षा जास्त कालखंड झाला तरी ठेकेदार काम करत नसल्याने महेश जावकर यांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले मेढा येथील विकासकामाबाबत दिरंगाई सुरु आहे. तरी 26 जानेवारी पर्यत काम सुरु न झाल्यास 26 जानेवारी रोजी मालवण नगरपरिषद समोर उपोषणास बसण्याचा इशारा महेश जावकर यांनी नगरपालिका प्रशासनास दिला आहे.