मालवणात उद्या मतदार जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली

मालवण, दि.२४ जानेवारी

राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण शहरातील देऊळवाडा येथील नारायण मंदीर ते मालवण तहसिलदार कार्यालय पर्यंत मतदार जनजागृतीच्‍या दृष्‍टीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मालवण शहरातील युवक – युवती, मतदार व नागरीक यांनी सदर रॅलीमध्‍ये आपल्‍या मोटर सायकलसह सहभागी व्‍हावे, असे आवाहन मालवणच्या तहसि‍लदार वर्षा झाल्टे यांनी केले आहे.