पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.२४ जानेवारी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शुक्रवार दि. 26 जानेवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून पोलीस परेड मैदान, ओरोस जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता पोलीस परेड मैदान, ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, पोलीस परेड मैदान, ओरोस जि.सिंधुदुर्ग सकाळी 11 वाजता किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीची भेट. स्थळ शासकीय विश्रामगृह ओरोस जि.सिंधुदुर्ग. सकाळी 11.20 वाजता सिंधुदुर्गनगरी व्यापारी संघटना यांची भेट. स्थळ. शासकीय विश्रामगृह ओरोस. सकाळी 11.30 वाजता ओरोस येथून आंगणेवाडी ता. मालवण जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता आंगणेवाडी ता. मालवण येथे आगमन व आई भराडीदेवी मंदीर परिसरातील स्वच्छतागृहाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता आकेरी- दुकानवाड- शिवापुर रस्ता भुमिपूजन व दुकानवाड उपवडे मुख्य नदिवरील पुल, आंबेरी या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, उपवडे पुल माणगांव ता.कुडाळ. दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर कुणकेरी –हरिजनवाडी रस्ता ते माडखोल तलाव रस्त्यांच्या कामाच्या भुमिपुजन कार्यक्रमास उपिस्थिती. स्थळ. कुणकेरी ता. सावंतवाडी सायं. 6 वाजता भोगवे नेवाळे धुपप्रतिबंधक बंधारा या कामाचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ भोगवे- नेवाळे ता. वेंगुर्ला. सायं. 6.30 वाजता भोगवे- नेवाळे ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग येथून मनोहर विमानतळ (मोपा) गोवाकडे प्रयाण.