पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्गनगरी, दि.२४ जानेवारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. हा शासकीय समारंभ कार्यक्रम शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर 9.30 ते 9.40 दरम्यान पोलीस व राखीव पोलीस दल यांचे संचलन होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.