नांदगाव येथे हजरत असलदे पिर बाबाचा ३१ जानेवारी रोजी ऊर्स मुबारक

कणकवली २४ जानेवारी (भगवान लोके)-

नांदगाव येथे हजरत असलदे पिर बाबाचा ऊर्स मुबारक सालाबादप्रमाणे बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी असलदे येथे होणार आहे .
या ऊर्स मुबारक निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी 2 वाजता दोन्ही गौसिया मस्जिद येथून पिर बाबा चा संदल फूलाची चादर घेऊन सलाम नातेशरीफ पढत निघेल दुपारी तीन वाजता नांदगाव तिठा येथे रातीब खेळ होणार आहे .सलाम नातेशरीफ पढणार व सायंकाळी 4 .30 वाजता नांदगाव येथून पिर बाबा चा संदल फूलाची चादर घेऊन सलाम नातेशरीफ पढत बाबा च्या दर्गा शरीफ कडे निघेल रात्रीं 7 वाजता पिर बाबा चा स॑दल फूलाची चादर आलेल्या सर्व भाविक ग्रामस्थ यांना घेऊन बाबा ची फूल चादर सदल चढवणार व येथे सलाम नातेशरीफ पढणार दुऑ ( प्रार्थना) गा-हाणे सांगून आलेल्या सर्व भाविकांचे नवस बोलणार व बोललेले नवस फेडणार रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत बाबा ची नियाज ( प्रसाद) होणार आहे व रात्री 10 वाजता खास कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
तरी सर्व असलदे पिर बाबा च्या ऊर्स मुबारक ला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नांदगाव ऊर्स कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.