देवगड मधील श्रीराम भक्तांची लेण्याद्री गिरिजात्मज श्री गणेश मंदिरात महाआरती

0

नगरसेवक विशाल मांजरेकर यांच्या साई ट्रॅव्हल्स द्वारे अष्टविनायक, जेजुरी, शिर्डी या देवदर्शन यात्रेचे आयोजन

देवगड,दि २२ जानेवारी
अयोध्या नगरी मधील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देवगड जामसंडे, तळेबाजार ,शिरगाव लिंगडाळ मिठबाव परिसरातील नागरिक रामभक्त यांनी अष्टविनायक मधील श्री क्षेत्र लेण्याद्री गिरिजात्मज येथिल गणेश मंदिरात २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी महाआरती करून श्री गणराया चरणी अक्षता अर्पण केल्या. देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक विशाल मांजरेकर यांच्या साई ट्रॅव्हल्स द्वारे अष्टविनायक, जेजुरी, शिर्डी या देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या यात्रेत देवगड जामसंडे तळेबाजार ,शिरगाव, मिठबाव वन्य भागातील भाविक भक्त महिला व पुरुष सहभागी झाले होते. या देवदर्शन यात्रेचे औचित्य साधून २२ जानेवारी दुपारी लेण्याद्री येथील श्री गणेश मंदिरात सर्वांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख शांती समृद्धी लाभो अशी प्रार्थना श्री गणेशाचरणी केली या उपक्रमाचे नेतृत्व देवगड किल्ला गणपती मंदिराचे विश्वस्त शिवराम निकम ,विशाल।मांजरेकर,सामाजिक कार्यकर्ते दयानंद मांगले ,गणेश आचरेकर गुरुनाथ मोर्ये यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली करण्यात आले होते .
या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शन ,जेजुरीचा खंडेरायाचे दर्शन ,शिर्डी येथील श्री साईनाथ मंदिराला भेट दर्शन शनिशिंगणापूर या ठिकाणी शनिदेवाचे , दर्शन घेतले .
या मकरसंक्रांती सणाचे औचित्य साधून या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने सुमारे ६० महिला भगिनींच्या उपस्थितीत विशेष हळदीकुंकू समारंभाचे आयोजन शिर्डी येथील साई आराधना या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना हळदीकुंकू ,तिळगुळ ,त्याचबरोब भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. देवदर्शनात यात्रेत सहभागी झालेल्या पुरुष बंधूंना देखील भेटवस्तू घेऊन आयोजक विशाल मांजरेकर यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.