बांदा, दि.२५ जानेवारी
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस तसेच विविध मागण्यांसाठी सावंतवाडी स्टेशन येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. उपोषणाला सर्व नागरिकांनी, विविध संस्था, संघटना, व्यापारी संघटना, रीक्षाचालक संघटना, वकिल – डॉक्टर संघटना तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन, सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना उपाध्यक्ष सागर सोमकांत नाणोसकर यांनी केले आहे.