मळगांव रेल्वे टर्मिनस येथे आज होणाऱ्या उपोषणाला मळगांव गावाचा सकिय सहभाग व पाठिंबा- गुरुनाथ गांवकर

सावंतवाडी, दि.२५ जानेवारी
कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उपोषणाच्या संदर्भात मळगांव ग्रामस्थ व रिक्षा चालक मालक संघटनेची व सावंतवाडी उपोषण कर्त्यांची मळगांव पेडेणेकर हॉलमध्ये संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वांनी आपण या उपोषणास सक्रिय सहभाग दर्शविला व एकमूखी पाठिंबा दिला. तसेच उपोषणाला जाणाऱ्या लोकांची रिक्षा संघटनेने जाण्या येण्याच्या सोयिची जबाबदारी स्विकारली आहे, अशी माहिती गुरुनाथ गावकर यांनी दिली.

मळगांव टर्मिनसला प्रा. मधुदंडवते यांचे नाव देण्यात यावे. टर्मिनसचे काम सद्या अपूर्ण आहे ते पूर्ण करावे व त्याला निधी उपलब्ध करुन द्यावा. प्रा. मधुदंडवते यांचा तैलचित्र लावण्यात यावे. ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत चालू करावे. तसेच मळगांव गावतील लोकांची जमिन गेली त्या लोकांना रेल्वे स्टेशनला व्यवसाय करण्यास प्राधान्य द्यावे. व रेल्वेमधील व्यवसाय करण्याचे कॉन्ट्रॅक्ट हे स्थानिक बचत गटांना देण्यात यावे तसेच बचत गटांना स्टॉल उभारण्यास जागा द्यावी. व सर्व गाड्या मळगांव रेल्वे टर्मिनस येथे थांबल्या पाहिजेत. अश्या प्रकारचे विचार मळगांव येथे आयोजित केलेल्या बैठकीत श्री. गरुनाथ गांवकर यांनी प्रखरपणे आपले विचार सर्वांसमोर मांडले.