एसटी आगार येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

देवगड, दि.२५ जानेवारी
प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी देवगड एसटी आगार येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे .यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२.३० वाजेपासून तीर्थप्रसाद दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत महाप्रसाद चे आयोजन केले आहे. यानिमित्त पारंपरिक डबलबारी भजनांचा जंगी सामना त्याचे ठीक ९.३० वाजता बुवा अजित मुळम हुर्शी ता.देवगड विरुद्ध बुवा संतोष शिरसेकर शिरसे ता.राजापूर यांच्यामध्ये रंगणार आहे तरी भजन प्रेमींनी या डबलबारी भाजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पूजा कमिटी राज्य परिवहन महामंडळ देवगड आगार यांच्या वतीने करण्यात आले आहे.