सावंतवाडी रेल्वेस्थानकात उद्या लाक्षणिक उपोषण

मोठ्या संख्येने सहभागी व्हा : अँड. निंबाळकर

सावंतवाडी,दि.२५ जानेवारी

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. याप्रसंगी सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात सहभागी व्हावं असं आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांनी केल आहे.