रेल्वे टर्मिनस आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

युवा रक्तदाता संघटनेचं आवाहन

सावंतवाडी,दि.२५ जानेवारी

प्रजासत्ताक दिनी मळगाव रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी टर्मिनस होण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची सुरुवात होत असून युवा रक्तदाता संघटनेनं याला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे.

स्वर्गीय माजी आमदार जयानंद मठकर, कै. डी.के. सावंत यांच्यानंतर मिहीर मठकर, सागर तळवडेकर, सागर नाणोसकर, भूषण बांदिवडेकर, तेजस पोळेकर या तरुण पिढीनं हे शिवधनुष्य उचलल आहे. अँड. संदीप निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या लाक्षणिक उपोषण होत आहे. याला समर्थ साथ देण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी,रक्तदाते मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होण्यासाठी आसपासच्या गावातील जनतेने तसेच सावंतवाडी शहरवासीयांनी आपल्या हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी सहभागी व्हावे असे आवाहन देव्या सुर्याजी यांनी केल आहे.